आपण सध्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळींवर तणावाशी झुंजतोय.
रोजच्या आपल्या आयुष्यात आपल्याला कळतही नाही असे असंख्य विचार आपल्या मनात येत असतात.
आपलं मन हे खूप मोठे भांडार आहे. त्याचं मोजमाप आपण करूच नाही शकत. चांगले-वाईट, आनंदी, भीतीदायक, काळजीयुक्त चिंता, भूतकाळातील चांगल्या-वाईट घटना, भविष्याची चिंता, वर्तमानाची काळजी असे अगणित विचार आपल्या मनात येत असतात. विचार येणं चुकीचे नाही नक्कीच, पण आपण त्याचा सामना कसा करतो हे महत्त्वाचे आहे.
सामान्यतः कुठलाही तणावपूर्ण प्रसंग असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल तेव्हा मानवी मन दोन पद्धतीने त्याला तोंड देतं.
1) एक म्हणजे Flight( पळून जाणे) प्रसंगाला तोंड न देणे.
2)दुसरा म्हणजे fight (लढा) समोर उभा टाकून तणावाशी सामना करणे.
आता अगदीच अनिश्चित काळासाठी आपल्या समोर आलेला जागतिक पातळीवरील साथीचा रोग "कोरोना" उभा टाकला आहे. तो आला आपल्याकडे डिसेंबरमध्येच आणि आपल्या बरोबर कधीपर्यंत राहणार आहे माहिती नाही. सगळ्याच गोष्टींबाबत अनिश्चितता आहे. त्यावर औषध कधी तयार होईल, त्याची लस कधी तयार होईल, केव्हा बाजारात उपलब्ध होईल, ती सामान्यांपर्यंत कशी पोहोचेल--- अनिश्चितता आहे.
त्यामुळे या प्रसंगापासून पळून जाऊन तुम्ही तुमच्या शहरातून दुसऱ्या शहरात/देशात जाऊ शकत नाही आणि तुमचं मनही या गोष्टीला विलग करू शकत नाही.
आपल्याकडे उपाय उरतो तो म्हणजे सामना करणे.
कोरोनाशी लढताना काही गोष्टी आहेत ज्या लिहिताना मला खूप सोप्या वाटतात पण आचरणात आणताना आपल्यासारख्यांना त्या खूप अवघड वाटतात.
जसं की झोप--आठ ते दहा तास झोप प्रत्येक माणसाला अतिशय गरजेची आहे. ती मिळाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या दुसऱ्या दिवशीच्या वागण्यावर होतो. सुट्टी आहे म्हणून किंवा वेळेचे बंधन नाहीये म्हणून रात्री उशिरापर्यंत वेबसिरीज बघणे सकाळी उशिरा उठणे, रात्री-अपरात्री उठून मोबाईल वरती व्हाट्सअप किंवा फेसबुक चेक करणे अतिशय हानिकारक आहे. हे ताबडतोब बंद करा. कमीत कमी आठ तास झोप हे आपल्याला मिळालीच पाहिजे.
पौष्टिक अन्न : अजून तरी आपल्याला व्यवस्थित भाजीपाला, धनधान्य, इतर खायच्या गोष्टी मिळत आहेत. व्यवस्थित नाश्ता- जेवण, रात्रीचे जेवण विभागून घ्या. आवश्यकतेनुसार कॅलरीज् चं प्रमाण ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा आहार ठरवा.
व्यायाम : व्यायाम करण्यासाठी सध्या बाहेर पडू शकत नाही आहोत पण घरच्या घरी खोलीतल्या एका टोकापासून बाहेरच्या खोलीच्या दुसर्या टोकापर्यंत पाऊले मोजा; ठराविक पावलांचा आकडा तुम्ही ठरवून घ्या आणि तेवढी पावलं रोज चाला. सुछरुवातीला हळूहळू चाला आणि त्यानंतर त्याचे रूपांतर ब्रिस्क वॉकिंग म्हणजे लगबगीने चालणे जेणेकरून तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा सुरळित होईल.
अजून एक व्यायाम प्रकार म्हणजे योगासनं! सोपी योगासने-- प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती हे तुम्ही अगदी सहजासहजी करू शकता.
व्यायाम करताना अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक हालचाली आणि श्वासोच्छ्वास यांचा समन्वय साधणे. सुरुवातीला थोडं अवघड जातं. प्रयत्नपूर्वक लक्ष द्या-- तुमच्या शारीरिक हालचालींची गती आणि तुमच्या श्वासोच्छ्वासाची गती यात समन्वय साधला की व्यायाम करताना तुम्हाला लय सापडेल आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल. याचा आपल्या शरीराला जास्त चांगला फायदा होतो.
व्यायाम करताना तुम्ही अशी वेळ ठरवू शकता जेणेकरून कुटुंबातील सर्वजण एकत्र जमून व्यायाम करू शकाल. तुम्हाला एकत्र वेळ व्यतीत करता येईल.
आणखीन एक गोष्ट म्हणजे मद्य, तंबाखू- सिगरेट्स आणि अतिरिक्त प्रमाणात साखर यांचा वापर टाळा.
हे झालं शारीरिक पातळीवर सामना कसा करायचा.
पुढील भागात बघू मानसिक पातळीवर तणावाशी कसं लढायचं !
Subscribe to:
Post Comments (Atom)
पावसाळा..तब्येत सांभाळा!
जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हम...
-
"स्वयंपाकाचा कंटाळा आलाय मला... मीच एकटीने चार चार वेळा सगळ्यांच्या आवडीचं करत रहायचं..." "हे work from home आहे की work f...
-
आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला कसं सांभाळायचं ते बघू.. पहिली गोष्ट म्हणजे परिस्थिती काय आहे हे समजून घ्या. कोरोना इतक्यात काही ...
सोप्या शब्दात मुद्दे मांडले , छान.
ReplyDeleteखूप मस्त.
ReplyDeleteअतिशय सुरेख विश्लेषण
ReplyDeleteआरोग्यासाठी उत्तम व माहितीपूर्ण विवेचन
ReplyDelete