Thursday, May 7, 2020

कोरोना_मानसिक ताणतणाव 1

"स्वयंपाकाचा कंटाळा आलाय मला... मीच एकटीने चार चार वेळा सगळ्यांच्या आवडीचं करत रहायचं..."

"हे work from home आहे की work for home आहे काही कळतंच नाहीए..."

"Patience तरी किती ठेवणार मी.. बाळ लहान आहे..त्यात घरकाम, बाई नाही, स्वयंपाक काम, बाळाचे शी शू चे कपडे धुवा.. सगळं झालं की परत बाळाला घेऊन बसा.. बाळाचा बाबा सारखं callवर मग काय.."

" हे लोक काही ऐकत नाहीत... सोट्टे दिले की बातमी मोठी करून सांगतात पण घरात रहा हे साधं समजत नाही"

" लॅब मध्ये सारखे सॅम्पल्स येत आहेत, मान मोडून काम करावं लागतंय.. वेळेत नमुने तपासून reports पोचले पाहिजेत hospital ला..तरच त्वरीत पुढील कार्यवाही करता येईल"

" साधं PPE Kit नाही देऊ शकत आहे संस्था.. बसायची फुरसत नाही, इतके patients बघतोय आम्ही, आमच्या जीवाची किंमत शून्य.. मग काही झालं की मार खायला आम्ही आहोतच"

" सध्या तरी राजकारण नको, सहाय्याने काम करु.. लोकांना काय उत्तर देणार आपण"

" खायला पैसे नाहीत आणि हा जाऊन उभा प्यायला.. कामावर कुणी घेईना.. जायचं झालं तर कसं जाणार?"

" कचरा किती करतात लोक.. उगाच पदार्थ करतात.. नाही आवडला की फेकून देतात"

किती विचार असे मांडता येतील प्रातिनिधिक स्वरुपात.. या कठीण समयी प्रत्येकाचं परीघ वेगळं, प्रत्येकाची विवंचना वेगळी.. त्याची तीव्रता वेगळी..
समाजातील हर एक घटकाला या कोरोनाने जेरीस आणलंय..
नोकरदार चिंतेत की नोकरी राहिल का जाईल.. व्यावसायिक चिंतेत की उद्योग ठप्प आहे, उत्त्पन्न नाही, तर विक्री कशी होणार.. फायदा तर दूरच घातलेलं भांडवल तरी मिळायला हवं.. staff ला पगार द्यायचा तरी कसा??

गृहिणी घरकाम करुन हवालदिल तर काम करणारी मदतनीस मावशी ताई परत कामावर कधी घेईल या चिंतेत.. तोवर घर कसं चालेल आणि पोट कसं भरेल!!

लहान मुले शाळा बंद परीक्षा नाही या आनंदात तर त्याबरोबरच बाहेर खेळायला आई का सोडत नाही या प्रश्नात..

सरकारला आर्थिक चिंता, लोकांना सेवा पुरवण्याचा ताण, परत सगळीकडून होत असलेला भडीमाराला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न..
.
.
.

आपण हे सगळं कसं सांभाळत आहोत? गेले दोन महिने हा सतत ताण आपण झेलतोय, पुढे किती दिवस सहन करावा लागेल माहिती नाही. या ताणामुळे शरीरावर काय परिणाम होतोय हे आत्ता नाही जाणवत. नंतर या त्रासाला तोंड द्यायलाच मोठी यंत्रणा उभी करावी लागेल.

सध्या इतकं करूया की रोज मिनीटभर प्रार्थना करू हे संकट लवकर संपेल.
सरकारने घालून दिलेले नियम पाळून शासनयंत्रणेवरचा ताण कमी करू.
पौष्टिक खाऊन तब्येत चांगली ठेवू.
प्राणायाम करून मन सशक्त करू. विचारात सुसूत्रता आणूया.

सगळेच जणं एकाच वादळात अडकलो आहोत. एकमेकांशी प्रेमाने वागून, एकमेकांच्या मदतीने यातून सुखरूप बाहेर पडूया.




26 comments:

  1. खूप छान लिहीले आहे.वास्तव चित्रण आहे.
    अभिनंदन.

    ReplyDelete
  2. Waiting for next write up..khup chaan..

    ReplyDelete
  3. गीता,अभिनंदन खूप मस्त.

    ReplyDelete
  4. गीता, खूपच छान, लिहीत राहा, शुभेच्छा व अभिनंदन.

    ReplyDelete
  5. Masta Geeta very nice
    Agadi manatla mandla
    Khup chhaan

    ReplyDelete
  6. खूपच मस्त लिहिले आहेस ताई.. पुढचा write-up पण नक्की share कर..

    ReplyDelete
  7. मस्त भाषाशैली... connecting to the situation good job keep writing waiting for next write-up��

    ReplyDelete
  8. सकाळी सकाळी एक सुखद प्रसन्न शिडकावा.छान लिहिले आहेस.शाब्बास अशीच लिहिती रहा.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. Satya Paristhiti ,chhan vishad keli ahe s keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. 😊😇पुढील भाग पण वाचा

      Delete
  11. किती नेमके,किती छान,खरचं"एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ"

    ReplyDelete
  12. छानच ! डाॅक्टर या नात्यानं आपल्याला काही विचारावेसे वाटतंय
    https://en.m.wikipedia.org/wiki/Herd_immunity
    हर्ड ईम्युनिटी बद्दल विकिपिडिया मधील माहिती वाचून काही नविन प्रश्न मनात आले. तसेच आतापर्यंत आपण या आजारा बद्दल उगाचच भिती निर्माण केली आहे असे जाणवले.
    प्रश्न १ एवढी चांगली माहिती विकिपीडिया वर असताना आपण आतापर्यंत हे का समजून घेतलं नाही ?
    प्रश्न २ ही माहिती जर सर्व चॅनेलवाल्यांनी किंवा सरकारने सर्वांना व्यवस्थित समजून का सांगीतली नाही ?
    प्रश्न ३ जगातले पुढारलेले देश हतबल का झाले ?

    आपण आपल्या चांगल्या सवयींचा व संस्क्रृतीचा उगाचच डांगोरा पिटत असून त्यामागचे खरे शास्त्रीय कारण समजून घेतलेले नाही किंवा आपल्याला धार्मिक चमत्कार वगैरे वर समाधन केलेले जास्त आवडते.
    विकिपीडियावरील हर्ड ईम्युनिटीच्या माहिती वरुन आपल्या लोकांची ईम्युनिटी चांगली असण्याची शास्त्रीय कारणे अशी आहेत.
    ‍‍१. बर्यापैकी नियमितपणे होणारे ॠतुबदल
    २. ॠतुबदलां प्रमाणे होणार्या आजारांचा मुकाबला करण्याची निर्माण झालेली क्षमता.
    ॠतुबदलाच्या वेळेस डाॅक्टरांकडे असलेली गर्दी त्याचेच निदर्शक आहे.
    ३. सार्वजनिक ठिकाणी असलेली स्वच्छते बद्दलची अनास्था त्यातून निर्माण झालेली रोग प्रतिकारक शक्ति.
    ४. आत्ता पर्यंत झालेले सर्वांचे सक्तीचे लसिकरण बिसिजी , देवी , काॅलरा , पोलिआो इ.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार,
      प्रतिक्रियेला उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगीर आहे.
      Herd immunity म्हणजे आजार बरा झाल्यानंतर शरीरात antibody तयार होतात, त्याद्वारे आपले व इतरांचे त्या आजारापासून संरक्षण होते.
      कोरोना हा विषाणू जुना आहे, पण त्याच स्वरूप बदललं आहे. त्याची ताकद आणि वेग वाढला आहे.

      आपल्या देशात लोकसंख्या हा ज्वलंत विषय आहे. साधा flu 2-4 दिवसात बरा होतो. घरात एकाला झाला की सगळ्यांना एकामागोमाग एक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      कोरोना चा incubation period 2-14 दिवस आहे, त्यात विशेष लक्षणे दिसून येत नाहीत पण विषाणू पसरण्याची शक्यता मात्र जास्त असते. त्यासाठी विलगीकरण आणि lockdown हे उपाय आहेत.

      Herd immunity चा उपयोग रोगी बरा झाला की होतो, पण आपल्या कडे प्रत्येक गोष्टीचा इतका बाऊ केला जातो की, याला कोरोना झालाय, याला इथे रहायला देऊ नका. डाॅक्टरांनाही सोसायटी हाकलवून लावते तर काय!!

      आपल्या आरोग्यव्यवस्थेवर ताण येऊ नये म्हणून कमीत कमी लोकांपर्यंत विषाणू पसरू देणं हा सहज सोप्पा उपाय आहे, तो lock down ही लोकं पाळत नाहीत ही खंत आहे!

      रुग्ण आत्ता कुठे कोरोना मुक्त होत आहेत.. तर herd immunity चा फायदा नक्कीच होईल.

      पुढारलेल्या देशांमध्येही हीच खंत आहे. विषाणू पसरण्याचा वेग खूप जास्त आहे, त्यामानाने आपली संरक्षक कवच कमी पडतात.

      आपलं नाव इथे आलं नाही आहे, सांगाल का?

      Delete
  13. As expectedVexpected, nice ma'am 👍

    ReplyDelete
  14. Khup chhan ani khare lihale ahe.

    ReplyDelete
  15. Very true, Geeta. Nicely written. You inspire me.

    ReplyDelete

पावसाळा..तब्येत सांभाळा!

जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हम...