मी अर्थव्यवस्थेतली तज्ञ नाही, पण जेवढं काही दिसत आहे आजूबाजूला त्यावरचे माझे विचार मांडतेय..
Lock down पंचेचाळीस दिवस झालेले आहेत.
सगळे उद्योग धंदे,सामान्यांची आयात-निर्यात,सामान्यांचे मुळात उत्पादन ठप्प आहे, बंद आहे. बरीचशी प्रोडक्शन युनिट्स काम करत नाहीयेत.
काय काय परिणाम होत असेल या सगळ्याचा !!
वर्क फ्रॉम होम ज्या कर्मचाऱ्यांना शक्य आहे त्यांचे पगार, त्यांचे काम आहे तितकाच चालू आहे. फक्त जाण्यायेण्याचा वेळ वाचतोय आणि इंधन वाचतेय.
स्टॉक मार्केट उतरण उतरणीला लागलेला आहे. आणि इतक्या दिवसापर्यंत दुर्लक्षिले घटक होते, समाजाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहेत ते घटक जसे की शेतकरी, दुग्ध व्यवसाय करणारे आणि भुसारी मालाचा व्यापार करणार आहे यांची मात्र दैनंदिन जीवनशैली आणि त्यांचं अर्थार्जन चालू आहे.
या उतरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थेच्या बळी ठरलेले घटक म्हणजे वेठबिगारी कामगार. प्रत्येक शहरात एखादा असा विभाग असतो जिथे रोज सकाळी जवळ साडेसहा पासूनच जत्थेच्या जत्थे जमतात माथाडी कामगारांचे. जे एका दिवसावर, एका दिवसाच्या मिळकतीवर त्यांचं पोट अवलंबून असतं.
पण दळण वळण बंद आहे, उत्पादन बंद आहे, बांधकामे बंद आहेत; त्यामुळे त्या मजुरांचे अर्थार्जन बंद आहे.
परप्रांतीय मजूर एकटे राहतात त्यांना त्यांच्या स्वगृही परतायचं होतं. कित्येक शेकडो किलोमीटर चालत ते लोकं स्वगृही परतले. यामधल्या प्रवासात ते काहीच जीव गेला, काहींच्या तब्येतीचा नुकसान झालं
सरकारने काही तरी ठोस उपाययोजना करेपर्यंत यांनी घाईघाईत स्वतःचे निर्णय स्वतः घेतले आणि नुकसान करून घेतलं.
स्वगृही परतल्यानंतर काही दिवस कुटुंबासमवेत व्यतीत करून परत पोटापाण्याचं काय हा प्रश्न त्यांना नक्कीच असेल. आणि परत येतील जेव्हा वेळ येईल तेव्हा तो एक वेगळाच गोंधळ होऊन बसेल कारण एवढ्या लोकांना परत आणणं आणि त्याच्यासाठी परत सगळी सोय करणं हे सरकारसाठी अवघड काम नक्कीच ठरेल.
आपल्या अर्थव्यवस्थेच्या बऱ्याच गोष्टी बाधकाम, कपडालत्ता आणि आयात-निर्यात या गोष्टींवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपली ढासळलेवली अर्थव्यवस्था उसळी घ्यायला
आपल्याला खूप वेळ लागणार आहे.
एक समाज म्हणून अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला बरेच वर्ष जावे लागणार आहेत अशा परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर आपली उपाय योजना काय असावी याबद्दल काही अगदीच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल मी आज लिहिते आहे.
1.) खर्च कमीत कमी करणे. लॉक डाऊन मध्ये पडून शॉपिंग करणे किंवा घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करणे हे दोन्ही ऑप्शन्स बाद आहेत. आपण सगळेच सध्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच घेतोय. दूध भाजीपाला फळ वगैरे !! हीच सवय लाॅकडाऊन उठल्यानंतर ही सहा ते आठ महिने आपण बाळगावी म्हणजे पैसा आपल्याजवळ आहे त्याची आपोआप बचत होईल.
2.) बर्याच ठिकाणी उत्पादन बंद आहे आयात-निर्यात बंद आहे मजुरांचे काम जाण्याची शक्यता आहे किंवा जे लोक मॅनेजमेंटला आहेत त्यांच्या इथे मनुष्यबळ कपात करा होण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी जॉब आपला जाऊ शकतो ह्या तयारी नुसार हातात किंवा बँकेत जेवढा पैसा आहे तो व्यवस्थित वापरणे गरजेचे आहे. नोकरी गेली तरी काही कालावधीनंतर ते परत मिळेलच. त्या कालावधीत मानसिक स्थैर्य, आर्थिक स्थैर्य गरजेचे असणार आहे. त्याची तयारी आतापासूनच करावी.
3.) कोणाही कडून कर्ज घेऊ नये. कुणाकडे उधार उसनवारी घेऊ नये. कितीही जवळचा असला तरी. अगदी निकडीच्या क्षणी काही मदत हवी असेल तरच ती घ्यावी कारण पैसा परत करणं ही एक वेगळी डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे उधार उसनवारी पासून चार हात लांब रहावे.
4.) वैयक्तिक पातळीवर जेव्हा आर्थिक आणीबाणीचा प्रसंग येईल तेव्हा आपल्याकडचे कुठले रिसोर्सेस आपण वापरू शकतो याची एक यादी तयार करावी. जी आपल्याजवळ आपल्या मनात कायम असली पाहिजे किंवा आपल्याकडे नोंद असली पाहिजे. जसं की एखादी छोटी-मोठी प्रॉपर्टी, सोन्याचे दागिने किंवा बँकेत ठेवलेल्या ठेवी ज्या पुढील आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी आपण केल्या होत्या, त्याला हात लावायचे आपण ठरवलेलं नव्हतं; पण तरीही आताच्या आर्थिक आणीबाणीच्या काळात काही पर्याय नसल्याने आपल्याला ते वापरावे लागणार आहे. त्याची छोटीशी यादी तयार ठेवावी, आवर्जून याची मानसिक तयारी मानसिक नोंद करून घ्यावी. 5.)काही महिन्यांनी, काही वर्षांनी परत सगळे सुरळीत होणार आहे. त्यानंतरही तुम्ही चांगले तुमचा आधार देण्याचे सोर्सेस चांगले करू शकता. आता सध्या तुम्हाला थोडासा मोकळा वेळ मिळतो आहे, त्यात तुम्ही तुमचे skills आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नवीन स्किल्स मुळे तुमच्या कार्यक्षेत्रात, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी फरक पडेल असा प्रयत्न करा.
6.) या सगळ्यातून बाहेर पडताना एक वेगळे, सकारात्मक होऊन जगाला नव्याने सामोरे जा.

Khup chhaan aahe. Vichar karayla lawanare aahe. Aapan kadhi unnecessary shopping karato.
ReplyDeleteWhich we can avoid
Informative