पावसाळ्यात प्रादुर्भावाने होणारे आजार व त्यांची कारणे:
1. मलेरिया- डास चावल्याने
2. डेंगी-डास चावल्याने
3. जुलाब, अतिसार, संग्रहणी- दूषित अन्न व पाणी प्यायल्याने
4. सर्दी खोकला- विषाणूजन्य/जीवाणूजन्य
5. दमा- हवेतील आर्द्रतेमुळे.
6. कावीळ- दूषित अन्न व पाणी सेवन
7. लेप्टोस्पायरोसिस- जखम झालेल्या पायाने दूषित पाण्यातून चालल्याने
8. पाणी कमी प्यायल्याने अपचन, मूतखडा
9. फ्लू
10. दहशत माजवणारा कोरोना.
11. टायफाॅईड- दूषित अन्न व पाणी सेवन
12. Fungal infections- दमट हवेमुळे.
काळजी कशी घ्यायची:
1. बाहेरील व उघड्यावरील पदार्थ टाळा.
2. पावसात भिजणे टाळा.
3. घराच्या आवारात पाणी साचत असेल तर वेळोवेळी ते साफ करा.
4. साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा.
5. डासांना प्रतिबंध करणारे उपाय- धूप, उदबत्ती, ओडोमास, mosquito repellent coils चा वापर करा.
6. Social distancing
7. Mask वापरणे.
8. बाहेरून आल्यावर हात व पाय स्वच्छ साबण लावून धुणे.
9. कपडे स्वच्छ धुवून, वाळवून वापरणे.
आहारः
1. ताजे व गरम , सकस अन्न सेवन करा.
2. आहारात सुंठ/आलं, मिरेपूड, हळद,गवती चहा, जीरे, हिंग, लसूण , मध यांचे प्रमाण वाढवा.
3. वरचेवर भरपूर व गरम पाणी प्यावे.
4. पावसाळ्यात पचन मंदावते म्हणून हलका आहार घ्यावा.
प्रत्येक आजाराची लक्षणे थोड्याफार फरकाने वेगळी असतात.
ताप, अंगदुखी, सर्दी खोकला इ. लक्षणे सगळ्या आजारांमध्ये दिसून येतात.
घाबरून न जाता व अंगावर न काढता त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या.
काळजी घ्या. आरोग्यास जपा.
- डॉ. गीता पुरंदरे.
9130424738
कोथरूड, पुणे.

This comment has been removed by the author.
ReplyDeleteफारच संक्षिप्त पण सुंदर माहिती
ReplyDelete