Sunday, July 5, 2020

पावसाळा..तब्येत सांभाळा!

जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हमखास वेगवेगळे आजार घेऊन येणारा मानला जातो.
 पावसाळ्यात प्रादुर्भावाने होणारे आजार व त्यांची कारणे:
 1. मलेरिया- डास चावल्याने 
2. डेंगी-डास चावल्याने 
3. जुलाब, अतिसार, संग्रहणी- दूषित अन्न व पाणी प्यायल्याने 
4. सर्दी खोकला- विषाणूजन्य/जीवाणूजन्य
 5. दमा- हवेतील आर्द्रतेमुळे. 
6. कावीळ- दूषित अन्न व पाणी सेवन 
7. लेप्टोस्पायरोसिस- जखम झालेल्या पायाने दूषित पाण्यातून चालल्याने 
8. पाणी कमी प्यायल्याने अपचन, मूतखडा
 9. फ्लू 
10. दहशत माजवणारा कोरोना. 
11. टायफाॅईड- दूषित अन्न व पाणी सेवन
 12. Fungal infections- दमट हवेमुळे. 
13. चिखल्या- पायाला भेगा पडणे.

 काळजी कशी घ्यायची: 1. बाहेरील व उघड्यावरील पदार्थ टाळा. 
2. पावसात भिजणे टाळा. 
3. घराच्या आवारात पाणी साचत असेल तर वेळोवेळी ते साफ करा. 
4. साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा. 
5. डासांना प्रतिबंध करणारे उपाय- धूप, उदबत्ती, ओडोमास, mosquito repellent coils चा वापर करा. 
6. Social distancing 
7. Mask वापरणे. 
8. बाहेरून आल्यावर हात व पाय स्वच्छ साबण लावून धुणे. 
9. कपडे स्वच्छ धुवून, वाळवून वापरणे. 

 आहारः 1. ताजे व गरम , सकस अन्न सेवन करा.
 2. आहारात सुंठ/आलं, मिरेपूड, हळद,गवती चहा, जीरे, हिंग, लसूण , मध यांचे प्रमाण वाढवा. 
3. वरचेवर भरपूर व गरम पाणी प्यावे. 
4. पावसाळ्यात पचन मंदावते म्हणून हलका आहार घ्यावा. 

 प्रत्येक आजाराची लक्षणे थोड्याफार फरकाने वेगळी असतात. ताप, अंगदुखी, सर्दी खोकला इ. लक्षणे सगळ्या आजारांमध्ये दिसून येतात. घाबरून न जाता व अंगावर न काढता त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या. काळजी घ्या. आरोग्यास जपा. 

 - डॉ. गीता पुरंदरे. 9130424738 कोथरूड, पुणे.

Tuesday, June 16, 2020

Whys and Hows

Dealing with Whys and Hows of life!!!
Why this happened with me??
How do I get through this??

Cause and effect is one of the fundamental rules of life that is applicable everywhere. If you throw a stone in a lake pond, it will surely produce ripples. The intensity of ripples simply depends on the force with which stone was thrown.

Every action has equal and opposite reaction.. If you do good to others, more good will come to you. Likewise be vigilant about how you behave with others. Someday or the other you will receive the same feeling from the World.

Its getting to vague, right!!

Now How do I get through this!??

First understand that :
☆ Your life has a purpose
☆ You are alive to pursue that Purpsoe
☆ You will realise that purpose only when you talk to yourself or to your Guru 
☆ You need to work towards fulfilling those duties.

In depth study would be really complex to reveal here. 

Meditation
Yoga
Are the tools to get you through all these things.



Depression is real

Suicidal thoughts are impulsive and the actions are at spur of the moment. Keep venting your negative emotions. Depression is dangerous.  Seek professional help.
We cant unwind a moment, but we can definitely surpass it with friends and family. Stay connected & seek help whenever needed.
Suicides are not easy to commit. If you have the courage to kill yourselves and a part of your loved ones, you definitely do have the strength to overcome the problems in your life.

A 13 year old cartoon film/screen addict
&
A 34 yr old bollywood celeb.. 
You had such a long life to prove your metle. 
How I wish you would have thought for a minute before finishing your lives !! Alas.. 
Life is not easy. Chossing death over life is all the more difficult for the people whom you leave behind.

These days wherein we find difficulty in trusting people easily, in achieving a new goal everytime,  and struggling to uplift our lifestyle, we miss out few simple things
- a daily talk to yourself!
- a daily talk to your higher purpose of existence-God you may name it.
- a daily conversation with your family members.

These simple things are lacking.

Ok, accepted trust is an issue. Why not seek a professional help? 
There are many to help you out, there are many helplines who let you be anonymous and share your worries.

Depression is a disease and that needs medicines and counselling both.

Talking and listening is a virtue which everyone might not have. 

And in this so volatile world of fame, sharing your dark side needs courage, needs right person. 

Speak up, seek help, keep venting.

#everylifematters
#everythoughtmatters
#lifeisagift
#depressionisreal

Tuesday, June 9, 2020

फणस

फणस 
उन्हाळ्याचे दिवस...
आंबा सरताना येणारा फणस आणि जांभळं!!! आंब्याइतकेच मला प्रिय!!

फणस - जितकं नाव सरळसोट तितकाच दिसायला ओबडधोबड. आंब्याच्या लगोलग वाढणारा.. कोकणी माणसाकडे फणसाचं झाड सापडणारच.
जितका बाहेरून काटेरी दिसतो तितकाच आतून गोड मधाळ!!! 
या lockdown च्या काळात फणस मिळणारच नाही असं वाटलं होतं पण एका परिचत स्नेहींनी आणून दिला अगदी घरपोच.

दोन दिवस ठेवला तसा.
अगदी हातभर लांबीचा होता.

Youtube वर शोधून झाले की फणस कसा चिरावा. 

फणस चिरणे म्हणलं की मला आमचे ठाण्याचे गोखले रोडला उभे असलेले काका आठवतात. ते त्यांच्या हातगाडीवर मन लावून, तल्लीन होऊन फणस कापायचे व ते बघायला मला फार आवडायचं.

Youtube  वर दोन वेगळ्या पद्धती दिसल्या- पिकलेला फणस कसा करावा आणि कच्चा फणस कसा चिरावा.
त्यात माझ्याकडे कोयता नाही घरी आणि विळीवर चिरायची सवय नाही.

दोन वेगवेगळ्या आकाराच्या सूरी, उलथनं, भरपूर तेल, एक पसरट भांडे आणि वर्तमानपत्र असा जामानिमा घेऊन मांडी घालून खाली बसले. मदतीला लेक होती आणि मला नंतर नक्की कुठला भाग भाजीत वापरायचा आहे आणि कुठला काढून टाकायचा आहे हे सांगायला सासूबाई होत्या.

दोन-तीन पद्धती युट्युब वर बघितला होत्या. त्यापैकी एक पद्धत सोपी वाटली, त्या पद्धतीने धारदार सुरीने दोनदा-तीनदा वर्तुळाकार आणि मग उलथन्याने व मोठ्या सूरीच्या मदतीने ते सगळे भाग वेगवेगळे केले. उलगडून बघितल्यावर छान पांढऱ्या फणसाच्या कळ्याच!! जणू काही कुंदाची फुले.

निसर्गाची किमया बघा.. बाहेरून काटेरी पण आतून किती छान!!  पांढरा शुभ्र कळ्या!! आणि पिकल्यावर पिवळे धम्मक रसाळ गरे..
गरे खाऊन पोट भरलं की तळलेले खारवलेले गरे 😋😋. फणसाची भाजी, फणसाचं लोणचं, सांदण.. कितीतरी प्रकार.

उन्हाळी पदार्थ बरेचसे आपल्या कोकणातून मिळतात. सुरुवात होते काजू, आंबे मग फणस. किती कष्ट घेतो कोकणी माणूस.


दुःख देऊन गेलेलं निसर्ग वादळ... त्यात झालेलं कोकणी लोकांचं अगणित नुकसान...
काही भागांमध्ये घरांमधले सामान वाहून गेलं आहे. काही भागांमध्ये आमराई, बागा सगळे उद्ध्वस्त झाली आहे. फणस केळीची झाडं कोलमडलेली आहेत.
यातून उभे राहण्याला त्यांना कित्येक वर्षे जावी लागतील.

परत नव्याने उभं करणं हे त्यांच्यासमोर आव्हान असेल. 

पण जसं फणसाच्या चीकाला चिवटपणा असतो तितकाच चिवटपणा कोकणी माणसांमध्ये असतो. शून्यातून विश्व उभं करणार कोकणी!!  मला खात्री आहे या प्रतिकूल परिस्थितीवर मात देऊन लवकरच कोकणी माणूस उभा राहील.

एक आवडीचा पदार्थ फणसाची भाजी.

आई अतिशय उत्कृष्ट फणसाची भाजी करतात. मी आणि माझा नवरा व सासूबाई आम्ही तिघेही फणसाच्या भाजीचा मनमुराद आस्वाद घेतो. 
यावर्षी माझ्या मोठ्या लेकीनेही फणसाची भाजी मिटक्या मारत संपवली आणि परत मागून घेतली याचा मला विशेष आनंद आहे.

काही गोष्टी परंपरागत आपण पुढे नेतो. त्यापैकी खाण्याच्या आवडी आपल्या मुलांमध्ये उतरल्या की आपल्याला अधिकच आनंद होतो.

फणसाच्या भाजीची तितकीच सोप्पी कृती:
जितका फणस घेऊ त्याचे निम्मे ओलं खोबरं, कांदा, लसूण, हिरवी मिरची कोथिंबीर.

हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आले आणि जिरे यांचा वाटण. कांदा परतल्यावर वाटणही परतायचं त्यामध्ये मग ओळखा बरं आणि चार शिट्ट्या करून शिजवलेला फणस एकत्र करायचा दोन मिनिटं वाफ आणायची- भाजी तयार आहे.

फणस व फणसांचा फोटो यासाठी श्री संजय देशपांडे आणि सौ संगीता देशपांडे यांचे विशेष आभार!

भाजी:

फणसः




Tuesday, May 12, 2020

आत्मनिर्भर

आत्मनिर्भर 


माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री आठ वाजता लाईव्ह आले होते  तेव्हा सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत होते, lockdown 3 संपून 4 होतं, का जनजीवन हळूहळू चालू करायला माननीय मोदी साहेब सांगतील.

आणि माननीय मोदींनी सांगितलं काय तर...

"आत्मनिर्भर भारत" !!


 इतर साधनसामग्री आतापर्यंत परदेशातून आयात करत होतो ती आता भारतात बनवली जात आहे. मेड इन चायना गोष्टींमध्ये आपण भागवत होतो, त्याच आता भारतात बनायला सुरुवात व्हावी अशी आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे.

आपल्या देशाची आर्थिक घडी जर आपण आपल्या चांगल्या कार्याने बसवू शकणार असू तर याहून चांगली गोष्ट काहीच नाही!!!

 


"आत्मनिर्भर" या शब्दाबद्दल आपण बोलूया... 


निर्भर म्हणजे अवलंबून असणे. आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर अवलंबून असणे.


स्वतःवर अवलंबून असणे म्हणजे काय ?? कुठलाही माणूस एकटा कुठलीच गोष्ट करू शकत नाही. त्याला त्याच्या टिमची किंवा त्याच्या जोडीदाराची साथ लागते.


आत्मनिर्भरता म्हणजे मी जे काम हातात घेतले आहे, मी जे ध्येय ठरवलेलं आहे ते मी माझ्या आत्मविश्वासाच्या बळावर पार पाडू शकेन; ते मी माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन व्यवस्थित यशस्वीरित्या मिळवू शकेन हा विश्वास. त्याच्या बळावर सुरू होणार आपलं सगळं ध्येय प्रेरीत कार्य म्हणजे आत्मनिर्भरता.


या प्रयत्नांनंतर येणार्या यशापयशाची जबाबदारी घेणं म्हणजेही आत्मनिर्भरताच बरं का!!


श्री. विनोबा भावे यांनी आपल्या "गीताई" मध्ये छान श्लोक मांडला आहे.

उद्धरावा स्वयें आत्मा खचू देऊ नये कधी |

आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला ||


किती सोप्या भाषेत त्यांनी आत्मनिर्भरतेचा संदेश दिलेला आहे.


एखादी गोष्ट सुरू करून ती अंतिम ध्येयापर्यंत यशस्वी रित्या पोहोचवणं किंवा करणं हा आत्मविश्वास, त्यासाठी लागणारे बळ, त्यासाठी लागणाऱ्या मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द आणि कुणावरही मानसिकरीत्या अवलंबून न राहता या सगळ्या गोष्टीतून तरुन जाणे म्हणजेच आत्मनिर्भरता.


तुमच्याकडे वेळ असतो, पैसा असतो, तुमच्याकडे मनुष्यबळ असते; पण एखादी गोष्ट करायची उर्मी तुमच्या आतून यावी लागते.

चार लोकांनी तुम्हाला सांगून हे करा अथवा हे असं करा म्हणून गोष्टी होत नाहीत. ते तुम्ही स्वतः तुमच्या मनाशी ठरवून पार पाडावं लागतं. त्यासाठी लागणारी जिद्द, संयम, चिकाटी हे ही उमजून जागवावं लागेल.

ही आत्मनिर्भरता जर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामासाठी वापरली तर तुम्ही यशस्वी होणारच.

यश-अपयश, यशाच्या मार्गावर जाताना येणाऱ्या अडचणी, त्यांचा आपण पाहिलेला सामना, त्यामुळे आपण शिकलेला धडा हे सगळे तुम्हाला वेगळा अनुभव देतात आणि  त्या त्या यशाचा मिळणारा आनंद म्हणजे एक वेगळीच नशा असते.


माननीय मोदींनी आपल्याला आत्ता पर्यंत इतक्या छान छान संज्ञांची आठवण करून दिलेली आहे..

"संयम ही संकल्प"

"संकल्प से सिद्धी" 

आणि 

"आत्मनिर्भर भारत"


पूर्ण राष्ट्र आत्मनिर्भर व्हायचं असेल तर त्यातली ही कोटींमध्ये जनगणना आहे, प्रत्येकानी आत्मनिर्भरतेचा थोडा तरी अंश आपल्यात अंगिकारावा. 

आपण जे काम ठरवू त्याची व्यवस्थित आखणी करून सुरुवात करणं, ध्येयाप्रत जाताना लागणाऱ्या काही लोकांची मदत घेणे आणि सगळ्यांना एकजुटीने घेऊन त्या ध्येयापर्यंत नेणे; ही आत्मनिर्भरता जर सगळ्यांनी अंगी बाणवली तर एक विशाल राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमा जगाच्या नकाशात नक्कीच उजळून निघेल.


तुमच्या मनातील  आत्मनिर्भरतेचा अंकुराला चांगल्या सकारात्मक विचारांचे खत पाणी घाला; नवीन काहीतरी ध्येय ठरवा आणि प्रगती करा.

तरच होईल आपला भारत आत्मनिर्भर.


सुरक्षित रहा, आत्मनिर्भर व्हा.

Monday, May 11, 2020

कोरोना_अर्थव्यवस्था

मी अर्थव्यवस्थेतली तज्ञ नाही, पण जेवढं काही दिसत आहे आजूबाजूला त्यावरचे माझे विचार मांडतेय.. 

Lock down पंचेचाळीस दिवस झालेले आहेत.
सगळे उद्योग धंदे,सामान्यांची आयात-निर्यात,सामान्यांचे मुळात उत्पादन ठप्प आहे, बंद आहे. बरीचशी प्रोडक्शन युनिट्स काम करत नाहीयेत. 
काय काय परिणाम होत असेल या सगळ्याचा !!
वर्क फ्रॉम होम ज्या कर्मचाऱ्यांना शक्य आहे त्यांचे पगार, त्यांचे काम आहे तितकाच चालू आहे. फक्त जाण्यायेण्याचा वेळ वाचतोय आणि इंधन वाचतेय.
 स्टॉक मार्केट उतरण उतरणीला लागलेला आहे. आणि इतक्या दिवसापर्यंत दुर्लक्षिले घटक होते, समाजाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहेत ते घटक जसे की शेतकरी, दुग्ध व्यवसाय करणारे आणि भुसारी मालाचा व्यापार करणार आहे यांची मात्र दैनंदिन जीवनशैली आणि त्यांचं अर्थार्जन चालू आहे. 

 या उतरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थेच्या बळी ठरलेले घटक म्हणजे वेठबिगारी कामगार. प्रत्येक शहरात एखादा असा विभाग असतो जिथे रोज सकाळी जवळ साडेसहा पासूनच जत्थेच्या जत्थे जमतात माथाडी कामगारांचे. जे एका दिवसावर, एका दिवसाच्या मिळकतीवर त्यांचं पोट अवलंबून असतं.
पण दळण वळण बंद आहे, उत्पादन बंद आहे, बांधकामे बंद आहेत; त्यामुळे त्या मजुरांचे अर्थार्जन बंद आहे.
 
 परप्रांतीय मजूर एकटे राहतात त्यांना त्यांच्या स्वगृही परतायचं होतं. कित्येक शेकडो किलोमीटर चालत ते लोकं स्वगृही परतले. यामधल्या प्रवासात ते काहीच जीव गेला, काहींच्या तब्येतीचा नुकसान झालं
 सरकारने काही तरी ठोस उपाययोजना करेपर्यंत यांनी घाईघाईत स्वतःचे निर्णय स्वतः घेतले आणि नुकसान करून घेतलं.
 स्वगृही परतल्यानंतर काही दिवस कुटुंबासमवेत व्यतीत करून परत पोटापाण्याचं काय हा प्रश्न त्यांना नक्कीच असेल. आणि परत येतील जेव्हा वेळ येईल तेव्हा तो एक वेगळाच गोंधळ होऊन बसेल कारण एवढ्या लोकांना परत आणणं आणि त्याच्यासाठी परत सगळी सोय करणं हे सरकारसाठी अवघड काम नक्कीच ठरेल.
आपल्या अर्थव्यवस्थेच्या बऱ्याच गोष्टी बाधकाम, कपडालत्ता आणि आयात-निर्यात या गोष्टींवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपली ढासळलेवली अर्थव्यवस्था उसळी घ्यायला
आपल्याला खूप वेळ लागणार आहे.

एक समाज म्हणून अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला बरेच वर्ष जावे लागणार आहेत अशा परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर आपली उपाय योजना काय असावी याबद्दल काही अगदीच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल मी आज लिहिते आहे.

1.) खर्च कमीत कमी करणे. लॉक डाऊन मध्ये पडून शॉपिंग करणे किंवा घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करणे हे दोन्ही ऑप्शन्स बाद आहेत. आपण सगळेच सध्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच घेतोय. दूध भाजीपाला फळ वगैरे !! हीच सवय लाॅकडाऊन उठल्यानंतर ही सहा ते आठ महिने आपण बाळगावी म्हणजे पैसा आपल्याजवळ आहे त्याची आपोआप बचत होईल.
 2.) बर्‍याच ठिकाणी उत्पादन बंद आहे आयात-निर्यात बंद आहे मजुरांचे काम जाण्याची शक्यता आहे किंवा जे लोक मॅनेजमेंटला आहेत त्यांच्या इथे मनुष्यबळ कपात करा होण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी जॉब आपला जाऊ शकतो ह्या तयारी नुसार हातात किंवा बँकेत जेवढा पैसा आहे तो व्यवस्थित वापरणे गरजेचे आहे. नोकरी गेली तरी काही कालावधीनंतर ते परत मिळेलच. त्या कालावधीत मानसिक स्थैर्य, आर्थिक स्थैर्य गरजेचे असणार आहे. त्याची तयारी आतापासूनच करावी.
3.) कोणाही कडून कर्ज घेऊ नये. कुणाकडे उधार उसनवारी घेऊ नये. कितीही जवळचा असला तरी. अगदी निकडीच्या क्षणी काही मदत हवी असेल तरच ती घ्यावी कारण पैसा परत करणं ही एक वेगळी डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे उधार उसनवारी पासून चार हात लांब रहावे.
4.) वैयक्तिक पातळीवर जेव्हा आर्थिक आणीबाणीचा प्रसंग येईल तेव्हा आपल्याकडचे कुठले रिसोर्सेस आपण वापरू शकतो याची एक यादी तयार करावी. जी आपल्याजवळ आपल्या मनात कायम असली पाहिजे किंवा आपल्याकडे नोंद असली पाहिजे. जसं की एखादी छोटी-मोठी प्रॉपर्टी, सोन्याचे दागिने किंवा बँकेत ठेवलेल्या ठेवी ज्या पुढील आयुष्याच्या सुरक्षिततेसाठी आपण केल्या होत्या, त्याला हात लावायचे आपण ठरवलेलं नव्हतं; पण तरीही आताच्या आर्थिक आणीबाणीच्या काळात काही पर्याय नसल्याने आपल्याला ते वापरावे लागणार आहे. त्याची छोटीशी यादी तयार ठेवावी, आवर्जून याची मानसिक तयारी मानसिक नोंद करून घ्यावी. 5.)काही महिन्यांनी, काही वर्षांनी परत सगळे सुरळीत होणार आहे. त्यानंतरही तुम्ही चांगले तुमचा आधार देण्याचे सोर्सेस चांगले करू शकता. आता सध्या तुम्हाला थोडासा मोकळा वेळ मिळतो आहे, त्यात तुम्ही तुमचे skills आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नवीन स्किल्स मुळे तुमच्या कार्यक्षेत्रात, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी फरक पडेल असा प्रयत्न करा.
6.) या सगळ्यातून बाहेर पडताना एक वेगळे, सकारात्मक होऊन जगाला नव्याने सामोरे जा.

पावसाळा..तब्येत सांभाळा!

जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हम...